Tuesday, February 22, 2011

Day 1

काल माझ्या सुट्टीचा पहिला दिवस :)
२० दिवसाच्या सुट्टी मध्ये खूप काय काय plan केल आहे.
रोजची काम आणि बरच काही planned  आहे :)

काल ठरवलं होत कि खूप दिवसात समीर / सुचित्रा शी नीट गप्पा मारल्या नाहीयेत.
निवांत दिवस भर online राहून गप्पा मरेन. खूप खूप timepass  करेन. facebook, gtalk, youtube, blogs etc etc
पण PC पुढे बसण्यापेक्षाही खूप काय काय जास्ती interesting केल मी काल :)

pipe लावून bike धुतली :) (थोडक्यात पाण्यात खेळले :p)
मग त्यात टाकी फुल पेट्रोल भरलं आणि मस्त तास दोन तास bike वर फिरून आले :)

दुपारी थोडावेळ cinema पहिला, काका काकुंशी गप्पा मारल्या :)
"पाडस" वाचायला घेतलं

swimming च्या कोचिंग ची आणि क्लास ची चौकशी करून क्लास लावून च आले :)
आणि आज पासून मी पोहायला शिकायला जायला लागले आहे :D yippie !!!!!!

संध्याकाळी माझं खूप दिवसांपासूनच स्वप्न पूर्ण झाल्यासारख वाटल
लग्नाच्या आधीच अमित आणि मी आमच्या वरांड्यात एक kane ची झोपळा सारखी खुर्ची आणली आहे
ती आणल्यापासून माझ्या मनात होत कि कधीतरी ह्याच्यावर बसून निवांत संध्याकाळ एन्जोय करायची
आणि काल तो दिवस आला :)
मस्त पैकी आल घालून चहा केला, ipod मध्ये latest आवडती गाणी टाकली आणि "पाडस" घेवून त्या झोपाळ्यात बसले.
चहाचे घोट घेत गाणी ऐकत मास्तपैकी तास भर पुस्तक वाचल :)

तस पाहायला गेल तर खास काही केल नाही काल
पण मज्जा मात्र खूप आली :)

आता उरले १९ दिवस :)
आज swimming चा day 1 होता, त्या बद्दल पुढल्या post मध्ये :)

Thursday, February 10, 2011

Happiness Everywhere

गेल्या काही दिवसात मी इतक्या छान छान newZ  ऐकते आहे की खरच असं झालंय  "Happiness  Everywhere" :)
ह्याबद्दल सविस्तर पुढील पोस्ट मध्ये :)

Tuesday, January 4, 2011

A Very Happy New Year to All of You

A Very Happy New Year to All of You :)

May all d dreams in ur eyes, all d dZires in ur heart n all d hopes in ur life blend together to give u d MOST SPECTACULAR NEW YEAR :)


जेंव्हा हा ब्लोग लिहायचा विचार केला होता तेंव्हा ठरवलं होत कि रोज काही न काही लिहायचं :)
पण जमलंच नाही, पण ह्या वर्षी नक्की लिहीन.

माझ्या मागच्या पोस्ट मध्ये मी लिहील होत ना कि सुचित्रा romantic छान लिहिते
तिची नवीन वर्षाची नवीन फ्रेश पोस्ट :  http://suchitrasays.blogspot.com/2011/01/blog-post.html

Keep Smiling
Cheers

Tuesday, November 30, 2010

वाचनाचा छंद

वाचनाची आवड आहे अस म्हणणारे खूप असतात.
त्यापैकी किती लोक खरच वाचतात?
मलाही कुणी विचारलं की तुझे छंद काय तर मी वाचन म्हणून सांगते.
आईकडे (माहेरी अस आम्ही कुणी कधीच म्हणत नाही......ह्या विषयावर next  पोस्ट मध्ये :) ) तर आईकडे असताना आम्ही library नव्हती लावली
त्यामुळे दर आठवड्याला नवीन पुस्तके किंवा मासिक घरी येण्याची आणि ती वाचायची सवय नव्हती.
तो पर्यंत मला वाटायचं की मी काहीही वाचू शकते. कारण इस्त्रीचे कपडे ज्या कागदात गुंडाळून येतात त्यावरच्या बातम्याही मी तो कागद कचर्यात टाकायच्या आधी वाचते :)

पण लग्नानंतर, इकडे मात्र २-२ libraries मधून पुस्तक येतात!!
अगदी "हट के" विषयावरची :)  शोधून शोधून आणलेली!
काका, काकू आणि अमित ती पुस्तक अगदी नित्यनेमानी वाचतात. खूप आवडीनी!
पण मी मात्र त्यातलं एक पण वाचू नाही शकायचे.
कधी कधी एखाद्या कथासंग्रहातली ललित किंवा romantic कथा वाचायचे.
तेंव्हा मला जाणीव झाली कि मला फक्त काहीच मोजक्या गोष्टी वाचायला आवडतात.
हलक फुलक आणि साध सोप्प :)
मला अजूनही युगंधरा सारख्याच कादंबर्या आवडतात.
अजूनही सुचित्रानी फक्त romantic कथाच लिहाव्यात अस वाटत.
परवा ती म्हणाली की ही नवीन लिहिते आहे ती गोष्ट तुला नक्की आवडेल, "प्रेमकथा नाहीये".
मनात म्हणाल अरे रे :|
कुछ भी बोलो अपने को तो यश चोप्रा कि romantic movies हि बारबार देखना अच्छा लागता है :p
एकदम philmy romance :D  किंवा family ड्रामा :)

काये की,
हलक फुलक वाचायला बर असत, वाचायचं आणि सोडून द्यायचं :)
जास्ती विचार नाही करायला लागत :)
म्हणूनच मला अजूनही चंपक, चाचा चौधरी किंवा लहान मुलांची कुठलीही पुस्तक वाचायला आवडतात :)
लग्नाआधी वाचायला घेतलेलं "Namesake ", अजून त्याच पानावर बुकमार्क आहे, एक ओळही नाही वाचली पुढची
पण Harry Potter ची मात्र २-३ पारायण करून झाली :)
म्हणूनच मला ब्लोग वाचायला ही आवडतात
कारण त्यावर कधी जास्त विचार करायला लागत नाही
किंवा ते "seriously " नाही घेतले तरी चालतात

ब्लोग वाचता वाचता मला नेहमी वाटायचं की कशी ही लोकं इतक छान लिहितात? कस जमत त्यांना अस लिहायला?
मी लिहील तर कुणीही वाचायचंही नाही :|
सुचित्राचे लेख वाचून तिला एका वृत्तपत्रकाराचा फोन आला की आमच्या paper मध्ये लिहाल का?
मी लिहिलेलं बहुदा मी ही पुन्हा कधी वाचायचे नाही :p
पण तरीही आपणही ब्लोग लिहावा अस खूप दिवस/महिने/वर्ष मनात होत
पण लिहायला छानस काही नव्हतच
आणि मला "हा माझा पहिला ब्लोग, कुठून सुरवात करू आणि काय लिहू कळत नाहीये" अस अजिबात लिहायचं नव्हत.
काल काहीतरी छान लिहीण्यासारख मिळाल म्हणून लिहील, buzz वर टाकल, म्हणल ब्लोग वरही हेच टाकून लिहायला सुरवात करावी

मी माझ्या परीचयाच्या सगळ्या व्यक्तींचे blog वाचते, hopefully कुणीतरी माझे ही वाचतील!
माझ्यासारख्या "selective " (कमी, कमी अगदी कमी level :|) वाचनाची आवड असलेल्या कुणाला जरी आवडले माझे पोस्ट्स तरी पुष्कळ आहे :)

पुन्हा भेटूच,
TaTa

Sunday, November 28, 2010

एक रविवारची सकाळ

आधी थोडी background !
शुक्रवारी पंकज ची ब्लोग पोस्ट वाचली :
http://www.pankajz.com/2010/11/govt-approves-mulashi-slaughter.html

आणि ठरवलं कि ह्या रविवारी जायचंच, त्या जागेच बर् वाईट होण्याआधी एकदा बघून याव :)
रविवार असून ही  दोघे पहाटे ५ ला उठलो आणि निघालो!
as usual, अमितनी मागच्या seat वर सगळ सामान कोंबल!!
पहिला stop मुळशी ला चहा आणि वडा पाव ते हि सकाळी सकाळी ६ ०० वाजता!
मग तुथून थेट ताम्हिणी मस्त थंडी होती आणि पोटात छान गरम गरम चहा गेला होता
अजून सूर्योदय ही झाला नव्हता ..... खूप दिवसांनी रविवारी बाहेर पडलो होतो, छान वाटत होत :)
घळई आणि secret lake पाहून ११ वाजता परत पुण्यात आलो.
ताम्हिणी डोंगरवाडी मध्ये कुठे ही कधी ही जा, मस्तच वाटत. कुठल्या ही season मध्ये! फार फार भारी!!

अमित चा मित्र "US ऑफ A" वरून महिना भरासाठी आलाय, मग सगळे breakfast साठी रू मध्ये भेटलो
नेहमी प्रमाणे FC रोड वर गाडी लावायला जागा न मिळाल्यामुळे venus च्या बोळात लावली आणि चांगले २ तास रू मध्ये timepass केला.

कधी नव्हे ते ५ वाजता उठले होते, कधी एकदा घरी जाऊन झोपते आहे अस झाल होत
म्हणून रू वरून परस्पर घरी जायचं ठरलं
गाडी काढायला गेलो तर, अमित ची laptop ची bag बाहेर पडली होती
अमित ला वाटल कि दार बंद करताना चुकून पडली असेल
मला म्हणाला "नशीब रिकामी होती bag   नाहीतर गेलाच असता laptop "
अस म्हणून गाडी कडे पाहिलं तर कळाल कि गाडी ची मागची काच चोरांनी फोडली आहे!!!!!!!!!!!
अमित हसलाच,  कि बिच्चारा चोर त्याला वाटल कि laptop आहे म्हणून इतकी risk घेऊन काच फोडली पण काही च नाही मिळाल
मग माझ्या लक्षात आलं कि कॅमेरा आणि माझी bag आतच मागच्या seat वर होती
२ मिनिट आमची तणतणलीच होती :O :O
पाहिलं तर कॅमेरा सुरक्षित होता, कारण त्यावर आमचे दोघांचे sweatshirts आणि माझी shawl होती :)
पण माझी बाग कुठे च दिसत नव्हती, चोराला तेवढंच मिळाल होत :|
पैसे नव्हतेच त्यात जास्त (अमित बरोबर असताना मी कशाला पैसे ठेवेन बरोबर? :p) पण सगळी cards आणि driving license होत!
मला चक्करच आली..... cards ब्लोक करा, FIR नोंदवा नवीन license बनवा खूप कटकटी :s
आम्ही लगेच गाडी काढली कि आधी घरी जाऊन cards block करूया
म्हणून laptop ची रिकामी बाग उचलली तर त्याखाली माझी bag !!!!!
त्यात सगळी कागदपत्र, घराची किल्ली आणि माझं license सगळ्या गोष्टी चोरांनी नीट ठेवल्या होत्या
आणि अगदी "चवंनी" सकट सगळे पैसे घेतले होते :)

मग तर मला खरच हसू आल , बिच्चारा चोर ! इतकी रिस्क घेऊन गाडी फोडली आणि फक्त १५०/- रुपये मिळाले :)
घरी जाऊन कार्ड्स ब्लोक केली आणि अजून हि ठरत नाहीये कि पोलिसात जाऊन तक्रार करावी कि नाही
१५० रुपयासाठी पोलीस खरच काही करतील का?
कि ह्यापुढे असा प्रकार तिथे होऊ नये ह्यासाठी ते दक्षता घेतली त्यासाठी तरी तक्रार नोंदवावी ?

तर असा होता माझा रविवार, secret lake वर सूर्योदय पहिल्याचा आनंद आणि आठवणी पेक्षा हि गोष्ट जास्ती लक्षात ठेवयाला लावणारा :)